Breaking News

वनविभागाच्या पथकाची एकाच वेळी १९ फर्नीचर दुकानदारांवर कारवाई

विशेष प्रतिनिधी – गडचिरोली

गडचिरोली :- दिनांक-२२/०६/२०२३ रोजी गुप्तपणे मिळालेल्या माहितीच्या आधारे आसरअल्ली परिक्षेत्रातील आसरअल्ली, जंगलपल्ली, अंकिसा, कंबलपेठा या गावातील संपुर्ण १९ फर्नीचर व्यवसायिकांवर सिरोंचा वनविभागाने विशेष कर्मचारी पथक तयार करुन एकाच वेळी छापे टाकण्यात आले, त्यावेळी खाली नमुद केलेल्या फर्नीचर मार्टमध्ये मोठया प्रमाणात अवैध रित्या सागसिलपाट / सागकटसाईज फर्नीचर मार्ट येथे आढळून आले.

त्यामध्ये (१) जय श्रीराम फर्निचर मार्ट, आसरअल्ली ( रविंद्र मिनाबाबू कासोजी )
( २) महालक्ष्मी फर्नीचर मार्ट, आसरअल्ली ( संतोष साबंय्या गोत्तुरी)
( ३) लक्ष्मी फर्नीचर मार्ट, आसरअल्ली ( समय्या पोचालू गंप्पा)
(४) त्रिमुर्ती फर्नीचर मार्ट,जंगलपल्ली ( देवेद्र लच्चन्ना गोत्तुरी)
(५) बालाजी फर्नीचर मार्ट, आसरअल्ली ( किशोर शंकर कोरटला)
(६) ओम श्री विराट फर्नीचर मार्ट जंगलपल्ली ( राजेंद्र अंकन्ना गोत्तुरी)
( ७) गंगापुत्रा फर्नीचर मार्ट, आसरअल्ली (राजकुमार समय्या पोटे)
(८) भार्गवचारी फर्नीचर मार्ट, अंकिसा (सुरेश चंद्रय्या अरिंदा) सर्व फर्निचर मार्ट मध्ये मिळून रक्कम रुपये- ७,५१,५९४/- तसेच लावारीस दिसुन आलेला माल अंदाजे किंमत ३४,३११/- असा एकुण ७,८५,९०५/- किंमतीचा माल जप्त करुन आसरअल्ली परिक्षेत्र कार्यालयात जमा करुन संबधित फर्नीचर मार्ट दुकानदार यांच्या विरुध्द भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये वनगुन्हा नोंद दाखल करण्यात आली आहे. वरिल सर्व फर्नीचर मार्ट धारकांचे परवाना दिनांक २३/०६/२०२३ रोजी पासुन कायमस्वरुपी रद्द करण्यात आले. तसेच सदर माल जप्त करित असतांना झालेल्या प्राथमिक चौकशी मध्ये क्षेत्रसहाय्यक आसरअल्ली यांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याबाबत आढळून आल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

चौकशी दरम्यान असे समोर येत आहे की, मिळालेला अवैध माल हा आसरअल्ली लगतच्या वनविकास महामंडळ (FDCM) च्या साग रोपवनातील तसेच प्रादेशिक जंगलातील आहे. या जागांची तपासणी सुरु आहे. अवैध साग तोड मधील गुन्हेगार सराईत असुन वनविभागातील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे, स्थानिक गावातील लोक माहिती देण्यास असहकार्य करणे या सारख्या बाबींमुळे वनविभागास अडचण निर्माण होत आहे. तरीही सदर गुन्हेगारांवर कडक कारवाई करुन त्यांच्यावर आळा बसविण्याचा पुरेपुर प्रयत्न सिरोंचा वनविभाग करीत आहे.

नजीकच्या काळातील ही मोठी कारवाई असुन यामुळे अवैध सागतोडीवर रोकथांब लागेल अशी खात्री आहे. फर्नीचर मार्ट यांना अवैध सागवान लाकूड पुरवठा करणारे गुन्हेगार हे अंकिसा, आसरअल्ली, कोपेला या गावातील लोक असुन त्यांची माहिती घेण्याची कारवाई जोमाने सुरु आहे. सदर कारवाई मध्ये पी.डी. बुधनवर, उपविभागीय वनअधिकारी सिरोंचा, पी. बी. झाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी बामणी व त्यांची चमु, एस.पी.बारसागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी झिंगानुर व त्यांची चमु, एन. टी. चौके, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रनिघ), पी.एम.पाझारे, वपअ फिरते पथक तसेच देचली परिक्षेत्रातील सर्व वनकर्मचारी असे एकुण ५० अधिकारी आणि कर्मचारी मिळून मोठी कारवाई केली.

वरील प्रकरणाची सखोल चौकशी पी. डी. बुधनवर, उपविभागीय वनअधिकारी, सिरोंचा यांच्या मार्गदर्शनाखाली- पी.बी. झाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बामणी हे करित आहेत. वरिल कार्यवाहीच्या अनुषंगाने सिरोंचा वनविभागातील अवैध वृक्षतोड/ अवैध वाहतुकीला नक्कीच आळा बसेल अशी खात्री व्यक्त केली आहे .

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

वयोवृध्द महिलेस मारहाण करुन जबरी चोरी करणारे दोन आरोपींना अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई * जिल्हा …

प्रतिबंधित बीटी बियाणे बाळगाणारे इसमांविरुध्द गुन्हा दाखल

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * पोलीसांची धडक कारवाई * * ५० किलो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved