चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करू
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-बोरगाव बुटी येथील सरपंच तसेच चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष असलेले श्री रामदास चौधरी व त्यांच्या गावातील गुंड प्रवृत्तीचे व भाजपचे आमदार बंटी भांगडीया यांचे निकटवर्तीय असणारे राकेश वाघ यांनी दिनांक २३/ ६/ २०२३ रोजी सरपंच रामदास चौधरी यांचेशी वाद घालून मी भाजप पक्षाचा कार्यकर्ता असून आमदार बंटी भांगडिया यांच्या अगदी जवळचा कार्यकर्ता आहे असे धमकावून काँग्रेसचे चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, सरपंच श्री रामदास चौधरी यांना जबर मारहाण केली.
सविस्तर वृत्त असे की गुंड प्रवृत्तीचे व भाजपचे कार्यकर्ते राकेश ताराचंद वाघ यांनी जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे विहिरीचे बांधकाम संबंधी म्हणजे शासकीय जागा ही राकेश तराचंद वाघ यांच्या कब्जात होती मोजणीनंतर शासकीय जमिनीत पाणीपुरवठा संबंधाने वाघ यांनी वाद केला सरपंच चौधरी यांना मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण करून राजकीय आकसापोटी मारहाण केली.
काही दिवसापूर्वी मोजा बोरगाव बुटी येतील भाजप कार्यकर्ते वाघ यांच्या खाजगी जागेमध्ये शासकीय निधीतून बोरवेल करण्यातून आमदार बांगडीया यांच्यासोबत प्रसार माध्यमातून आरोप केल्यामुळे सरपंच श्री रामदास चौधरी यांच्यासोबत वादविवाद सुरू होता त्याचा राग धरून आमदार भांगडिया यांनी स्थानिक कार्यकर्ते वाघ याला हाताशी धरून जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बांधकामाला धरून जाणून बुजून हेतूपरस्पर वाद करून मारहाण केली व स्वतःला दुखापत करून रिपोर्ट सुद्धा द्यायला गेले यावरून दोघांवरील गुन्हा दाखल करण्यात आला सरपंच चौधरी हे कर्तव्यावर असताना सुद्धा सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला राकेश वाघ यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करूनही त्यांच्यावर कुठल्याही कलमा लावण्यात आलेला नाही.
राकेश वाघ हे गुंड प्रवृत्तीची आहे त्यांनी सरपंच चौधरी यांना जेवे मारण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे राकेश वाघ यांना तात्काळ अटक करावी यासाठी आज तालुका काँग्रेस कमिटी चिमूर तर्फे उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ.सतीश भाऊ वारजूकर यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशन चिमूर तथा उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालय चिमूर यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय गावंडे पाटील , शहराध्यक्ष अविनाश भाऊ अगडे, चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन भाऊ ढोक, चिमूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नागेंद्र भाऊ चट्टे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नंदू पाटील गावंडे, मीडिया प्रमुख पप्पू शेख, तालुका उपाध्यक्ष अमोल जुनघरे, माजी सरपंच संजय बोबडे,घनश्यामजी रामटेके,अक्षय लांजेवार राकेश साठवणे, उपस्थित होते.