जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख इंजिनीरि गणेश चिडे यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यातील बोडखा (मोकाशी ) येथील तब्बल 30 शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन महामंडळ आगार व्यस्थापक वरोरा यांना निवेदन देण्यात आले. बोडखा येथील शालेय विद्यार्थीनि वरोरा शहरात शिक्षण घेत आहे. नेहमी वरोरा वरुण सुटणारी 6 वाजता असलेली बस, खांबाडाला सायंकाळी काल रात्री 8 वाजता आली मनजे 2 तास लेट आली त्यामुळे विद्यार्थीना भर पावसात वाट बगावी लागली आणि आदी सुद्धा नेहमी बस लेट येत होती.
त्यामुळे काही दिवसापूर्वी शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे यांनी आगार व्यस्थापक यांना भेटून सूचना दिली. सूचना देऊन सुद्धा बस वेळेवर आली नाही काल रात्रीचा मुसळधार पाऊस बघून मुलाचे हाल बघून शालेय विद्यार्थीना सोबत घेऊन दुसऱ्याच दिवशी आगार व्यस्थापक यांना निवेदन देऊन बस चा वेळ बदऊलून लवकारत लवकर बस पाठवावी अशी विनंती केली त्यामुळे शालेय विद्यार्थीचा वेळ वाचणार व अभ्यासाला फायदा होणार. तसेच आगार व्यस्थापक यांनी माहिती देताना बोडखा मोकाशी येथील बस टर्न घेताना व विद्युत तारा संदर्भात माहिती दिली व बस ला तारामुळे इजा पोहचू शकते अस मत आगार व्यस्थापक यांनी व्यक्त केले.
त्यामुळे तात्काळ गणेश चिडे यांनी एम. इ सी. बी.खांबाडा येथील कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधुन विदयुत तारांच काम करावे असे निवेदन दिले.त्यावेळी निवेदन देताना युवासेना जिल्हा सनमव्यक तथा माजी नगरसेविक दिनेश यादव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, शिवसेना शहर प्रमुख संदीप मेश्राम, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय झिले, शिवसैनिक सुरेश गुळगाने तसेच बोडखा मोकाशी येथील समस्त शालेय विद्यार्थी उपस्थित होते.