जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-दिनांक 5 जुलै 2023 रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमात ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे कार्यरत पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख प्रा. बिजनकुमार बलराम शिल यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पर्यावरण शास्त्र विषयासाठी पीएच. डी. उपाधी प्रदान करण्यात आली.
प्रा. बिजनकुमार शिल यांनी डॉ. महेंद्र ठाकरे, डॉ. खत्री महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली “चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील गावांमधील अल्फा, बीटा आणि गामा जैवविविधता आणि व्यवस्थापन पद्धतींच्या संदर्भात निस्तार पत्रक अंतर्गत जमिनीची पर्यावरणीय स्थिती” या विषयावर शोध प्रबंध प्रस्तुत केला.
त्यांच्या या यशाबद्दल ग्रामगीता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी, प्रा. डॉ. संदीप सातव, प्रा. हूमेश्वर आनंदे, प्रा. संदीप मेश्राम, प्रा. डॉ. वरदा खटी, प्रा. अरुण पिसे, प्रा. डॉ. निलेश ठवकर, प्रा. डॉ. युवराज बोधे, प्रा. डॉ. मृणाल वऱ्हाडे, प्रा. विवेक माणिक, प्रा. रोहित चांदेकर, प्रा. महमुद पठाण तसेच सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.