राष्ट्रिय विश्वगामी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षाची उल्लेखनीय कामगिरी
रत्नपाल डोफे यांची जिल्ह्यात प्रशंसा
तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव
राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील राणी अमरावती, चंडकापुर,वैजापूर, करळगाव कोटंबा या गावामध्ये काल रात्री झालेल्या ढगपुटी पावसामुळे नदीला आलेल्या महापुरामुळे वरील नदी कडीला असलेल्या गावातील घर व घरातील संपूर्ण अंनाज कपडा लता नदीच्या पुरा वाहून गेल मात्र या मध्ये कोणतीही जीवित हानी झाली झाली नाही त्यांची राहण्याची व्यवस्था आजू बाजूच्या गावातील प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आली.
सदर गावातील पूरग्रस्त लोकांचा ठाव ठीकाना लागे पर्यंत जेवण्याची जबाबदारी राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांनी उपस्थीत संघटनेच्या बाभूळगाव महिला तालुकाध्यक्ष सौ वर्षाताई वाकडे. प्रेमिला बोबडे. पालवी नागमोते. गावातील सरपंच. ग्रामसेवक.तलाठी.पोलीस पाटील. बीट जामदार मध्ये घेतली आहे .
त्यामुळे पूरग्रस्त लोकांन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने खुप आधार मिळाला असे उदगार. समंधित गावाचे गावकरी मंडळी. पोलीस पाटील. सरपंच. ग्रामसेवक. तलाठी. बीट जामदार यांनी व्यक्त केले आहे