Breaking News

वाघेडा ते नेरी रस्त्याची दुर्दशा

वाघेडा वासियांना नेरीला येण्यासाठी अर्धा किलोमीटरच्या रस्त्यासाठी करावा लागत आहे १५ किलोमीटरचा जास्तीचा प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील वाघेडा वासीयांना उसेगांव – वाघेडा उमा नदीवर पुलाचे बांधकाम पुर्ण झाले पण अर्धा किलोमीटरचा रस्ता न झाल्यामुळे वाघेडा वासीयांना १५ कीलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे.चिमूर तालुक्यातील वाघेडा हे गांव सात सदस्यीय ग्राम पंचायत असुन या गावातील नागिकांना व वीहीरगांव, बेलारा, पळसगांव, पीपर्डा , मदनापुर , सोनगाव या गावातील नागिकांना नेरीला येण्यासाठी वाघेडावरून जवळ पडतो. पण उमा नदीवर पुलाचे काम पुर्ण झाले पण अर्धा किलोमीटरचा रस्ता पुर्ण चीखलमय झाल्याने दुचाकी, सायकल , पायदळ सुध्दा वाघेडा घाटावरून जावु शकत नाही.

 

या कारणांमुळे नागरीकांना मोठा ञास सहन करावा लागत आहे . .एखाद्याची तब्येत,महिलेच्या डीलीव्हरी अचानक बीघडली तर येथील नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे .वाघेडा वासीयांना उसेगांव वरून नेरी फक्त ७ की.मी.अंतरावर आहे .पण अर्धा कीलोमीटरचा रस्ता पुर्ण चीखलमय झाल्याने १५ कीलोमीटरचा जास्तीचा प्रवास अडेगांव,म्हसली या मार्गे करावा लागते .याकडे संबंधित विभागाने व लोकप्रिनिधीने लक्ष देवून ही समस्या दूर करावी अशी मागणी येथील नागरीक करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

{ समस्या क्रमांक 03 } रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे कोट्यावधींचा खर्च पाण्यात

पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत देवटाकळी ते झोरापूर रस्त्यावर खर्च कोटींचा काम लाखात विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख …

शिष्यवृत्ती परिक्षेत वेदांती गभणे विद्यार्थिनीचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित प्राथमिक स्तरातुन फेब्रुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved