जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
भद्रावती:-चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती येथे हुतात्मा स्मारक मैदानावर नुकतीच वर्ड तायकांडो युनियन आय टी एफ क्लब ची बेल्ट परीक्षा संपन्न झाली, बेल्ट परीक्षा शिहान राकेश दिप यांनी आयोजीत केली होती मुख्य प्रशिक्षक म्हणुन शिहान शितल तेलंग , शिहान श्रीनीवास होते प्रशिक्षक सेन्साई विनोद सोनारकर , सेन्साई संदीप चावरे हे होते यामध्ये सहा विद्यार्थीनींनी भाग घेतला होता.
सर्व विद्यार्थीनींनी काता , स्पायरींग व मुमेंट करून परीक्षा उतीर्ण केली त्यामध्ये दामिनी सुर्यवंशी हिने ब्ल्याक बेल्ट १ डान , साची चावरे ऑरेज बेल्ट तर कशिष रोगे , साक्षी चपट , सोनाक्षी कोडस्कर , ऋतुजा रोगे यांनी एलो बेल्ट प्राप्त केले . परीक्षकांनी व पालकांनी पुढील वाटचालीसाठी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.