Breaking News

उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा:-उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह निमित्त गरोदर माता व बाळंतपण झालेल्या माता व त्यांचे नातेवाईक यांना पोषण आहारविषयी मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.यांचे प्रास्ताविक सौ.गीतांजली ढोक आहारतज्ज्ञ यांनी केले कार्यक्रमाची माहिती व महती समजावून सांगितले.या वर्षांच्या थिम विषयी माहिती दिली.

*सुपोशीत भारत सशक्त भारत सक्षम भारत*
*हे वर्ष त्रुनधान्य वर्षं, भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे*

सौ.वंदना विनोद बरडे सह.अधिसेविका यांनी सर्व अन्नघटक फळ त्रुनधान्य, भरड धान्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.संपुर्ण अन्नधान्य,फळ कळधान्ये, इत्यादी वस्तू ज्या मधुन शरीराला आवश्यक असणारे घटक कार्बोहाइड्रेट, फाॅट, जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ, स्निग्ध पदार्थ, आणि इत्यादी घटकांविबयी माहिती दिली.कोणत्या घटकांपासून काय मिळतं,किती मिळत कस बनवायचा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच तिनं, चार धान्य मिक्स करून काय बनत त्यांचे फायदे काय हे समजावून सांगितले.शेती ही शेंद्रीय पध्दतीने का करावी त्याचे फायदे समजावून सांगितले.आणी या वर्षाच्या थीमप्रमाणेभरड धान्य, त्रुनधान्य का महत्वाचे आहे हे समजावून सांगितले.हे धान्य स्वस्त आणि मस्त शरीरासाठी आहे.

आणी आपल्या कळील शेती ही त्यासाठी उपयुक्त आहे.आणु याची शेती वर्षातुन तीन पिक घेता येतात अंशी ही काही वस्तु आहे जे आपण पिकवू शकतो.आणी हे धान्य आपण आपल्या दररोजच्या जीवनात वापरुन धुरंधर आजारांवर मात करू शकतो.आणी हे आपले धान्य त्यांच्या पाककृती पारंपारिक पद्धतीने बनवायचे समजावून सांगितले.ही त्रुनधान्य भरड धान्य पचायला हलका आणि पोषण युक्त आहे.म्हणुन त्याचा वापर आपण करायला पाहिजे.परसबाग लावायला पाहिजे.लोखंडाची कढई मातीची भांडी जेवन बनवायला वापरली पाहिजे.तसेच मीठाचा वापर कमी करावा.

मैद्याच्या आणि फास्ट फूड चा वापर करू नयेत.या सर्व वस्तू एक एक वस्तू दाखवून व पिरामिड बनवून दाखविले.तसेच कोंब आलेल्या धान्य का खायचे,कसे बनवायचे हे समजावून सांगितले.आणी आपलं जेवणाच ताट,थाली कशी असायला पाहिजे हे समजावून सांगितले.आणी उपस्थित महिलांना प्रतिप्रश्न करून माहिती विचारली त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे आव्हान केले.आणी है सर्व घटक सर्व स्तरातील लोकांना चालते कश्याचीही पध्य करायचं नाही आणि गैरसमज दूर केले.या कार्यक्रमात श्रिमती कोडापे, वैष्णवी भोंडवे, प्रियंका सोनूले, गीतांजली ढोक,सौ.वंदना विनोद बरडे यांनी मेहनत घेतली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved