जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
यवतमाळ:-आज दिनांक 13 ऑक्टोबर 2023 ला सोनामाता हायस्कूल चहांद येथे मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्य करणारी ‘नंददीप’ फाउंडेशन मध्ये समाज सेवा करणारे चौथे सर, अच्छेवार मॅडम, भोयर मॅडम, यांनी भेट दिली आणि नंदादीप फाउंडेशन या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या कार्यांची माहिती दिली. ही संस्था यवतमाळ जिल्ह्यातील मनोरुग्ण व्यक्तींसाठी कार्य करत आहे.ज्या व्यक्ती मनोरुग्ण आहेत, बेघर व रस्त्यावर इतरत्र फिरताना आढळतात अशा रुग्णांची सेवा करणे, त्यांची काळजी घेणे, त्यांना जेवण देणे, यासारखे कार्य ही संस्था करते.
असे प्रतिपादन चवथे सर यांनी केले. यवतमाळ जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर्स या रुग्णांची तपासणी व सुश्रुषा करतात असे त्यांनी सांगितले. तसेच नंदादीप संस्थेला आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन देखील केले. या आव्हानाला प्रतिसाद म्हणून येथील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपल्या परीने नंदादीप या संस्थेचा आर्थिक आर्थिक सहाय्य म्हणून काही रक्कम देऊ केली. अशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची जाणीव निर्माण करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना देण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.