Breaking News

वडार समाज प्रणित जय भवानी मित्र मंडळ शेवगाव आयोजित भव्य मशाल यात्रा एकवीरा देवी ते शेवगाव भव्य आयोजन ~ गोपाल उर्फ काळु अण्णा कुसळकर

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव, 9960051755

शेवगाव:-शेवगाव शहरातील अनेक वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला “वडार समाज शेवगांव” प्रणित “जय भवानी मित्र मंडळ” शेवगाव आयोजित भव्य मशाल यात्रा प्रवास गेली कित्येक वर्ष वडार समाजाचे तरुण आणि युवक मोठ्या भक्ती भावाने कधी “भवानी माता” तुळजापूर, “जगदंबा माता” अंबाबाई कोल्हापूर “सप्तशृंगी माता” वनी “रेणुकामाता” माहूरगड आणि यावर्षी पुणे जिल्ह्यातील एकवीरा देवी या जागृत देवस्थानावरून भव्य मशाल मिरवणूक काढून ती येत्या पंधरा तारखेला घटस्थापनेच्या दिवशी शेवगाव शहरात वाजत गाजत आगमन होईल वडार समाजाचे देवी भक्त व सामाजिक कार्यकर्ते श्री काळु अण्णा उर्फ गोपाल पांडुरंग कुसळकर हे गेली सहा वर्षांपासून भक्ती भवाने स्व खर्चातून भव्य मशाल मिरवणुकीचे आयोजन करत असतात वर्षभर शेवगाव येथे सकल वडार समाज शेवगाव यांच्यामार्फत अनेक सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवले जातात.

*ताजा कलम*

*यंदा नवरात्र उत्सवामध्ये जय भवानी मित्र मंडळ मार्फत विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन महिला वर्गा साठी करण्यात आल्या आहेत अष्टमीच्या दिवशी भंडाऱ्याचे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे परिसरातील va पंचक्रोशीतील अनेक देवीभक्त या नवरात्र उत्सवाचा आनंद घेत असतात*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खळबळ शहर टाकळी मध्ये लक्ष्मी देवीच्या यात्रेत मर्डर

शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत जुन्या वादातून एकास मारहाण शेवगावच्या …

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved