Breaking News

तालुक्यातील विविध समस्यांबाबत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना राळेगावच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

नवक्रांतीचा उगम लिहिणारे हात , नाईलाजास्तव संघर्षास सज्ज

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

राळेगाव:-“नवक्रांतीचा उगम लिहिणारे हात, नाईलाजास्तव संघर्षास सज्ज”.राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ राळेगाव यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना दि. 5/12/2023 ला राळेगाव तालुक्यातील अनेक महत्वाच्या शेतकरी, मजूर वर्ग यांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.


राळेगाव तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या ( जिवाळ्याच्या) उदभवणाऱ्या समस्या प्रमुख्याने
1) राळेगाव तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून सरकारी जागेवर वास्तव्य करणाऱ्या अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे यावे. तसेच सध्या ज्याची घरकुल धारक म्हणून निवड करण्यात आली त्यांना नियमाकुल करण्यात यावे, 2) राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत, अवकाळी मदत व पिक विमा देण्यात यावा 3) शेतकऱ्यांना ओलतीसाठी वीजपुरवठा दिवसा सुरळीत ठेवावा 4) राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील पशुवैदकिय दवाखाण्याला नियमित पशुवैद्यकीय अधिकारी तात्काळ देण्यात यावा, 5) पि. एम. किसान योजनेच्या वंचित शेतकऱ्यांना तात्काळ लाभ द्याव, व पुर्वी लाभ दिलेल्या शेतकऱ्यांकडून लाभाचे देय परत मागण्यात येवू नये, 6) राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पांदन रस्त्याची समस्या खुप मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याने व शेतामध्ये जाण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ पांदन रस्त्याची निर्मिती करण्यात यावी, 7) बांधकाम कामगारांना 2014 च्या जिआर नुसार प्रमाणपत्रावर ग्रामसेवकानी सही देण्यात यावी, 8) राळेगाव तालुक्यातील अवैध रेती वाहतूक तात्काळ बंद करून रेती माफीयांचे मुस्के आवरावे, तसेच घरकुल बांधकामाकरीता नियमानुसार रेती उपलब्ध करून द्यावी, ईत्यादी अतिआवश्यक समस्या राळेगाव तालुक्यातील असून त्या समस्या आपण आपल्या स्तरावर लवकरात लवकर निकाली काढाव्या अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना राळेगाव तालुक्याच्या वतीने देण्यात आले असून वरील समस्या त्वरित निकाली न निघाल्यास हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर व राळेगाव तालुका अध्यक्ष खुशाल वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना उठाव घेतील याकरिता उपविभागीय अधिकारी व संबंधित विभागाला तालुक्यातील समस्याचे निवेदन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना राळेगाव तालुक्याच्या वतीने देण्यात आले.

यावेळी राळेगाव विश्वगामी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष खुशाल वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर, सचिव शशीम कांबळे, कार्याध्यक्ष उमेश कांबळे, संघटक अक्षय वीरुळकर, उपाध्यक्ष गणेश हिवरकर, ग्रामीण उपाध्यक्ष अरविंद, कोडापे, सहसचिव अजय जुमनाके, संपर्कप्रमुख गोपीचंद ढाले, शंकर पंधरे, चेतन वर्मा,सुरज ढाले,प्रसिद्धी प्रमुख असलम पठाण, नानाजी येणोरकर, सुधाकर दांडेकर,सागर हिकरे, प्रशांत भगत,विवेक कुमरे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved