विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव
शेवगाव:-शेवगाव नेवासा पैठण पाथर्डी या तालुक्यामध्ये पशुधन गाय बैल म्हैस कुत्रा शेळी मांजर मेंढी कोंबडी घोडा आदी प्राण्यांचे सुयोग्य उपचार होण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मदत होण्यासाठी शेवगाव शहरामध्ये प्रथमच आत्याधुनिक पशुवैद्यकीय आत्याधुनिक “गोमाता पशुरोग निदान” प्रयोगशाळे चा भव्य उदघाटन समारंभ तहसील कार्यालय समोर अंबिका कॉलनी पाथर्डी रोड येथे दिनांक 4 जानेवारी 2024 गुरुवार रोजी रोजी सकाळी 11 वाजता ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के महंत जोग महाराज संस्थान आखेगाव ह.भ.प. रामगिरी महाराज येळेश्वर संस्थान येळी ह.भ.प. राम महाराज उदागे सुसरेकर पाथर्डी तालुका पाथर्डी या संत मोहंतांचे उपस्थितीमध्ये शुभहस्ते होणार आहे कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संचालक दिलीप केशव गोरडे आणि श्री.बाळासाहेब सुभाष पवारल यांनी केले आहे.
*ताजा कलम*
“या आत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे शेवगाव पाथर्डी नेवासा पैठण या तालुक्यातील गोधन पशुधन पाळीव प्राणी यांचेवर गंभीर आजारांवर योग्य ते उपचार करण्यासाठी निश्चित मदत होईल यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना काम करणे सोपे जाईल व आजाराची लवकर निदान होऊन प्राण्यांचे प्राण वाचविण्यासाठी याची निश्चित मदत होईल अशी अपेक्षा करावयास हरकत नाही”
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*