शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती उत्साहात साजरी
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
(भंडारा –) पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे दिनांक 3 जानेवारी २०२४ रोजी सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून संजना संजीव भांबोरे उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंकिता रामटेके उपस्थित होत्या .प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय रंगारी, निमाताई मोहरकर( रंगारी ),संजय नासरे ,उमराव सेलोकर, मामा वैद्य ,प्रणय रामटेके, श्रामनेर बुद्धपाल ,सुरेखा वंजारी ,निमराव वंजारी ,अंबादास मेश्राम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत माता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.
मार्गदर्शन करताना कुमारी संजना संजीव भांबोरे म्हणाल्या की , सावित्रीबाई जन्माला नसत्या तर चपरासी पदापासून देशाच्या राष्ट्रपती ,पंतप्रधान पदापर्यंत महिला पोहोचू शकल्या नसत्या .सावित्रीबाईंनी अत्यंत कठीण परिस्थितीत लोकांचा अपमान सहन करून मुलींना शिकविण्याचे कार्य केले .यापूर्वी जेव्हा मुलींचा जन्म व्हायचं तेव्हा त्यांना चूल आणि मुल एवढ्या पुरतीच मर्यादित ठेवायचे .त्यांना शिक्षणा पासून दूर ठेवायचे आणि घर कामातच गुंतवून ठेवायचे .त्यामुळे स्त्रियांचा विकास होत नव्हता .परंतु आज महिला पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. त्यांच्यामुळेच आम्हाला आज या ठिकाणी बोलण्याची संधी मिळत आहे. ती सावित्रीबाईची देण आहे.