विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960052755
शेवगाव:- दिनांक 04/01/2024 गुरुवार याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी केलेली मारहाण व दिलेल्या त्रासामुळे पोलीस ठाण्यातून तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या पतीचा शोध घ्यावा व त्यास जबाबदार असणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शहरातील जनाबाई दीपक गावडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे काल निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझे पती दीपक गावडे यांना चार-पाच दिवसापासून पोलीस कर्मचारी फोन करून पोलीस ठाण्यात बोलावित होते, शनिवारी 30 डिसेंबर 3023 रोजी एका पोलीस उपनिरीक्षकांनी फोन करून धमकावून पोलीस ठाण्यात हजर रहा असे सांगितले. या दिवशी ते पोलीस ठाण्यात सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होते .या वेळेत माझ्या पतीला पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी मारहाण केली .त्यावेळी माझ्या पतीने मला व दीर सागर गावडे यांना फोन करून घडलेली माहिती दिली व हा माझा शेवटचा फोन आहे,मी आत्महत्या करणार आहे असे सांगून फोन बंद केला आहे.माझ्या पती विरुध्द कुठलीही तक्रार नव्हती तरीही पोलीस अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण केली,त्यांच्या त्रासाला कंटाळून पतीने जर जीवाचे काही बरे-वाईट केले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मारहाण करणारांची राहील. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करून पती दीपक रावसाहेब गावडे यांना परत आणून द्यावे अशी मागणी जनाबाई गावडे यांनी केली आहे.
*ताजा कलम*
*बेपत्ता तरुणाची एक बहीण शेवगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असून तिच्या नातेवाईकांच्या पैसे वसुलीसाठी तिने आपल्या पदाचा गैरवापर करून संबंधित तरुणाला कुठलाही गुन्हा दाखल नसताना शेवगाव पोलीस स्टेशनला बोलावून बेदम मारहाण केल्याची चर्चा शेवगाव शहरामध्ये सुरू आहे चोर तर चोर वर शिरजोर असा तर काही प्रकार झाला नाही ना माझ्या पतीला बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून बडतर्फ करा सौ. जनाबाई गावडे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*