जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
(भंडारा)- लाखांदूर तालुक्यातील सरांडी बूज येथे समता सैनिक दलाच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्य धम्म प्रसार बौद्ध विहार येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित समता सैनिक दलाच्या सैनिकांना मार्गदर्शन करतांना सर्व जाती धर्माला एकत्र आणण्यासाठी समता सैनिक दलाची गरज आहे असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे लाखांदूर तालुका प्रमुख रोशन फुले यांनी केले आहे.बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली व समता सैनिक दलाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन महापुरुषांना वंदन करून रॅली काढण्यात आली.आपले विचार व्यक्त करतांना ते पुढे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विषमतावादी व्यवस्थेने जो त्रास दिला व त्यांना दलीत, पिछडे, आदिवासी, गाव कुसाबाहेर राहणाऱ्या लोकांना जागृत करण्याचे काम करतांना त्यांच्या सभा उधडून लावण्याचे काम काही लोक करीत असत. त्यांच्या सभा व्हाव्यात व त्यांचे विचार जन सामन्यात पोचावे यासाठी आपल्यातील सेवानिवृत्त सैनिक अधिकाऱ्यांनी एक दल स्थापन केला त्यालाच बाबासाहेबांनी समता सैनिक दल असे नाव दिले.
सर्व समाजाला एकत्र आणन्यासाठी समता सैनिक दलाच्या नावाचं रोपट गाव गावात लावण्याचा काम आपल्याला करायचं आहे. गाव तिथं शाखा घर तिथं सैनिक हे बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचे काम आपल्याला करायचं आहे असे मत व्यक्त केलं.या कार्यक्रमाला अध्यक्ष मा. गजेंद्र गजभिये राष्ट्रीय स्टॉप आफिसर, मार्गदर्शक आर.सी फुल्लुके, प्रमुख पाहुणे सी. डी. गौरे सर, जयपाल टेंभुर्णे तालुका प्रमुख पवनी, लालजी बनकर, गुनप्रिया वानखेडे, मंगला सारजरे , दर्शना रामटेक, शिल्पा बारसागडे, अरविंद ठाकरे सरपंच सारांडी, प्रभुजी ढोरे, सुबोध धनविज, सेवक पिल्लेवान यांनी सुद्धा समता सैनिक दलाच्या सैनिकांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्नील गणवीर यांनी केले.कार्यक्रमाला मांढळ, बेलाटी, मासळ, खैरी, सोमनाला, वलनी, बाचेवाडी, पिंपळगाव, आसगाव तसेच परिसरातील शाखेचे सैनिक हजर होते. कार्यक्रमाला यसस्वी करण्याकरिता सरांडी बूज शाखा समता सैनिक दलाच्या सर्व सैनिकांनी अथक परिश्रम घेतले.