शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सणासुदीच्या काळात गटार तुंबली गटार रस्त्यावर नागरिक ‘बदका सारख्या उड्या मारतात टना टना”
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:- गेल्या काही दिवसापासून शेवगाव शहरातील गजबजलेल्या व तीन बाजारपेठांचा मुख्य चौक असलेल्या मेन रोड सराफ बाजार जैन गल्ली कापड बाजार यांना जोडणारा हा शहरातील गजबजलेला मुख्य चौक आहे परंतु शेवगाव नगर परिषदेचा ढिसाळ कारभार कायम तुंबलेल्या गटारी यामुळे या चौकातील दुकानदार ग्राहक पादचारी आणि सर्वसामान्य महिला आबालविरुद्ध यांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत, एकीकडे पालिकेकडे अतिरिक्त कर्मचारी आहेत म्हणून बोंबा मारल्या जातात.
परंतु साफसफाई ची कामे आणि इतर गोष्टींमध्ये कायम “ढिसाळ कारभार दिसत आहे” यामुळे शहरवासीयांना कायम हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत शेवगाव नगर परिषदेचा कारभार म्हणजे “भीक नको पण कुत्रा आवर” असा झाला आहे काही ठिकाणी गटारी नाहीत काही ठिकाणी रस्ते नाहीत काही ठिकाणी काय मंदार असतो कोट्यावधी रुपयांचे कामे झाली परंतु शहराची अवस्था बेकार बकाल झाली आहे याला जबाबदार कोण?
शेवगाव शहराच्या विकासावर तासात भाषण जोडणारे अशावेळी कोणत्या बिळात जाऊन बसतात.
*ताजा कलम*
ऐन संक्रांतीच्या सणांमध्ये या भागात महिलांची वर्दळ असते त्यांना बदकासारख्या उड्या मार खरेदी करावी लागते या भागात पाच ते सहा रस्ते एकत्र येत असल्याने शहराचा कायम गजबजलेला भाग असतो परंतु झालेले विकास कामांचं ताळमेळ नसल्याने सपना मेडिकल समोर धोकादायक अवस्थेत मोठी गटार आहे तिथे कायम नागरिक धडपडत असतं याकडे नगरपालिका लक्ष देणार का???
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*