राज्य क्रीडा दिनानिमित्त कुस्तीस्पर्धा
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा)- आलिंपीकवीर खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव व्हावा व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी म्हणून केंद्र शासन व राज्य शासन त्यांच्या जन्मदिनी १५ जानेवारी राज्य क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.शारीरिक तंदुरुस्ती शिवाय जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात उज्वल कामगिरी बजावू शकता येणार नाही. त्यासाठी बळकट शरीरात बळकट मन यांचे जिवनात अपार महत्व आहे. शारिरीक मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी कुस्ती खेळणे गरजेचे आहे. खेळांपासुन बौध्दीक, प्रगती वाढत असते. तरूणांनी व्यसनापासुन दुर राहुन खेळाच्या माध्यमातून शारीरिक विकास साधावे. खेळ हा मानवी जिवनाचा अविभाज्य घटक आहे. विविध खेळांमुळे अनेक खेळाडू निर्माण झाले.त्यामुळे जिल्ह्याचा नाव महाराष्ट्रात चमकत आहे. म्हणून पहेलवानांनी खाशाबा जाधव यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे असे प्रतिपादन कुस्तिगीर परिषदेचे राज्यस्तरीय पंच अशोक बन्सोड यांनी केले.
ते क्रिडा व युवक सेवा संचालनालय, म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद शाखा भंडारा, जाणता राजा कुस्ती स्पोर्ट अकॅडमी भंंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य क्रिडा दिनानिमित्त महाराष्ट्राचे महान खेळाडू व स्वतंत्र भारताचे पहीले वैयक्तीक ऑलिंपिकवीर पदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिनानिमित्त मार्गदर्शन करतांना बोलत होते.
सदर कुस्तीस्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, भंडारा जिल्हा कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास शहारे व पहेलवान रामनरेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुस्तिगीर परिषदेचे राज्यस्तरीय पंच अशोक बन्सोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा जिल्हा कुस्तिगीर परिषदेचे प्रशिक्षक विलास केजरकर, भंडारा जिल्हा कुस्तिगीर परिषदेचे जिल्हा सचिव महेश शहारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलनातील कुस्ती प्रशिक्षण केंद्र भंडारा येथे मान्यवरांच्या हस्ते ऑलिंपीकवीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी ऑलिपीकवीर खाशाबा जाधव यांचे व खेळाचे महत्व पटवून दिले. जिवनावर खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. कुस्ती स्पर्धेत भंडारा जिल्हयातील जवळपास ७५ च्यावर मुले-मुली कुस्तीपटू व क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा प्रशिक्षक उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी पहेलवानांना खाशाबा जाधव यांच्या जीवनावर व त्यांनी क्रीडा प्रकारामध्ये मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल माहिती देण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना ऑलिंपिक खेळाबद्दल तसेच ऑलिंपिक खेळात उत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडू बद्दल माहिती देण्यात आली. विजयी पहेलवानांना मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदित्य जनबंधू यांनी केले तर उपस्थितांचे आभार हर्ष करवडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता क्रिडा मार्गदर्शक योगेश खोब्रागडे, आदित्य जनबंधू, लक्की मेश्राम, प्रज्वल दामले, साहस रामटेके, रोहित हनवते, प्रशिक बोदेले, रितेश मेश्राम, सम्यक वासनिक, अविनाश भोयर, शुभम बागडे, हर्ष करवडे, महेष धुळसे, आदित्य शहारे, आशिष देशकर, प्रज्वल शहारे, सोनल पंचबुद्धे, राजश्री पंचबुध्दे, संस्कार बांडेबुचे, नेहाल घोनमोडे, विवेक चटप, अनुष्का डहारे, पूजा समरित, करण बांडेबुचे, रजत मेश्राम, आदेश बांडेबुचे, संदिल पंचबुध्दे, नूतन माटे, वेदांत तरारे, अंशुल मडामे, शावण मारवाडे, अनन्या मडामे, यामिनी माटे, अश्विनी माटे, अंशुल मडामे, शावण मारवाडे, श्रृजंल राघोर्ते, अनन्या मडामे, संजोनी लांजेवार, मिलन मोहरकर इत्यादी पहेलवान बांधवांनी सहकार्य केले.