जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
नाशिक:-छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे 26/01/2024 रोजी 12 वाजता, नाशिक येथे पद नियुक्ती सोहळा संपन्न झाला.छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक शरद (अण्णा) पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र सोहळा पार पडला.छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक शरद (अण्णा) पवार यांचा हस्ते नियुक्ती सोहळा प्रसंगी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ( महिला आघाडी) पदी सौ. अश्विनी गुलशनसिग परमार, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र नाशिक शहर सरचिटणीस (महिला आघाडी) पदी सौ. सोनाली विशाल रावत व छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी शामराव रविंद्र सुतार यांची नियुक्तीपत्र घेऊन निवड करण्यात आली आहे.
नियुक्ती सोहळा प्रसंगी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र प्रदेश चे महासचिव व कायदेशीर सल्लागार adv. अलका मोरेपाटील, छावा जनक्रांती संघटना उत्तर महाराष्ट्र चे अध्यक्ष सौ. ज्योतीताई परदेशी , नाशिक शहर महिला आघाडी अध्यक्ष adv. उषाताई पगारे, नाशिक जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सुनीताताई गांगुर्डे,नाशिक शहर अध्यक्ष संदीप काकड, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गौरव तिडके, ॲड. योगिता मॅडम, हभप. लक्ष्मण महाराज, नीलिमा मॅडम वर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.