Breaking News

‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’ चे जिल्ह्यात 39367 अर्ज प्राप्त

अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चंद्रपूर, दि. 17 : – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. या योजनेचे जिल्ह्यात ऑफलाइन आणि ऑनलाईन मिळून एकूण 39 हजार 367 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात वैयक्तिक रित्या भरलेल्या व इतर संस्थांनी भरलेल्या अर्जाचा समावेश नाही. अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ऑफलाइन पद्धतीने 22,476 तर ऑनलाईन पद्धतीने 16891 असे एकूण 39 हजार 367 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात शहरी अंगणवाडी केंद्रात (ऑफलाईन 5529, ऑनलाईन 3859 एकूण 9388 अर्ज), ग्रामीण अंगणवाडी केंद्रात (ऑफलाईन 14931, ऑनलाईन 11994 एकूण 26925 अर्ज), चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सुविधा केंद्रात (ऑफलाईन 1429, ऑनलाईन 535 एकूण 1964 अर्ज), जिल्ह्यातील नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रात असलेल्या सुविधा केंद्रात (ऑफलाईन 117, ऑनलाईन 90 एकूण 207 अर्ज) तर जिल्ह्यातील विविध सेतू केंद्रामध्ये (ऑफलाईन 470, ऑनलाईन 413 एकूण 883 अर्ज) अर्ज प्राप्त झाले आहेत. यात वैयक्तिकरित्या महिलांनी भरलेले व इतर सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी भरलेल्या अर्जाचा समावेश करण्यात आला नाही.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात चिमूर …

पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved