विशेष प्रतिनिधी-नागपूर
नागपूर :- डॉ. आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष कुणाल कांबळे यांच्या नेतृत्वात मॉरेस कॉलेज संविधान चौक, नागपूर येथे विद्यार्थ्यांना निशुल्क संविधानाच्या प्रतिचे वितरण करण्यात आले. संविधानाच्या पुस्तकाचे निशुल्क वितरण करता वेळेला मॉरेस कॉलेजचे संचालक डॉ.मनोहर कुंभारे आणि प्रो.लाखे सर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रतिचे वितरण केल्या नंतर पुढिल महिण्यात 15 नोव्हेंबर संविधान गौरव परीक्षाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परीक्षेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस लॅपटॉप तर द्वितीय क्रमांकाचे बक्षिस विदयार्थ्यांना शिक्षण साहित्त्य करीता मदत तर तृतिय क्रमांकाला मोबाईल टॅब बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरीता संस्थेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ साखरे,सदस्य भोजराजजी हाडके, सतिश गजभिये, अक्षय गजभिये,शक्ति सुखदेवे,कपिल चवरे, महिला शहर अध्यक्ष सुजाता मसराम, तिलक टेंभुर्णे इत्यादींनी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिती दर्शवून संविधान प्रतिच्या वितरणास सफल बनविले. तसेच निशुल्क संविधानच्या प्रति उपलब्ध करून घेण्याकरीता डॉ. आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशनच्या रजिस्टरवर नोंदणी करून घेतले.