जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- शंकरपुर येथील उपवनक्षेत्राअंतर्गत नियतक्षेत्रा मधील राखीव वन कक्ष क्रमांक 46 मध्ये अवैधरित्या उत्खनन व वाहतुक प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी दोन ट्रॅक्टर रेतीसह कारवाई करीत केले जप्त. शंकरपुर येथील नितयक्षेत्रात वनाधिकाऱ्यांनी गस्ती दरम्यान ट्रॅक्टरचा जंगल वाज असल्याने त्या भागात गेले असता तिथे दोन ट्रॅक्टर रेतीने भरलेले दिसले. पाहणी केली असता त्या ट्रॅक्टर व बिना नंबरचे ट्रॉलीसह 100 घनफुट रेतीसह व दुसरे बिना नंबरचे ट्रॅक्टर टॉलीसह 80 घनफुट व फावडे घमेलेसह आढळून आले. सदर ट्रॅक्टर मालकाबाबत चौकशी केली असता गंगाधर दिवा हवे, रा. शंकरपुर वय 40 वर्ष यांचे मालकीचे असल्याचे आढळून आले.
दोन ट्रॅक्टर सोबत आरोपी ड्रायव्हर निखील मंगरु सहारे, रा. शंकरपुर वय 24 वर्षे, दुसरा आरोपी ड्रायव्हर लखन श्रीराम रा. शंकरपुर वय 24 वर्ष, लखन शालीक चौधरी, रा. शंकरपुर वय 26 वर्ष, अशोक लक्ष्मण घरत, करपुर वय 27 वर्ष, जिवन सुधाकर दडमल, रा. शंकरपुर वय 24 वर्ष,लक्ष्मण जानवा रंदई, रा. शंकरपूर 26 वर्ष, जगदीश रवी सहारे, रा. शंकरपुर वय 24 वर्ष, सुमीत वाल्मीक मेश्राम, रा. शंकरपुर वय 20 वर्ष, संदीप जॉथरु सावसाकडे, रा. शंकरपुर वय 24 वर्ष सर्व राहणार शंकरपुर यांचेवर भारतीय वन अधिनि 27 चे कलम 26(1) (G), 41 व 42(2) नुसार वनगुन्हा क्रमांक 09147/228661/2024 दिनांक 28/10/20 न्वये गुन्हा नोंद करुन दोन्ही ट्रॅक्टर एकुण 180 घनफुट रेतीसह बारा प्लॉस्टिकचे टोपले, नऊ लोखंडी फावा क लोखंडी सब्बल जप्त करुन दोन्ही ट्रॅक्टर वनपरिक्षेत्र कार्यालय चिमुर येथे जमा केले.
प्रकरणाचा तपास किशोर देऊरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे) चिमूर यांचे मार्गदर्शनात सं तकर, वनपरिमंडळ अधिकारी शंकरपुर हे करीत असून कार्यवाही दरम्यान उध्दव लोखंडे क्षेत्र सहाय पार, राजेंद्र मेश्राम क्षेत्र सहाय्यक चिमुर, राहुल सोमेश्वर भुरले वनरक्षक शंकरपुर, विशाल सोनुने वनरक्ष लीदास गायकवाड वनरक्षक, रुपेश केदार वनरक्षक, अक्षय मेश्राम वनरक्षक, प्रदिप ढोणे हे हजर होते.