राळेगाव तालुका संघटनेला केल्या मार्गदर्शक सूचना व एकजुटीने लढा देण्याचा दिला आदेश
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :- युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांची राळेगाव येथील विश्रामगृह येथे दि. 11/12/2024 ला युवा ग्रामीण पत्रकार संघटना राळेगाव येथील सदस्यांना भेट दिली.
यावेळी 6 जानेवारी 2025 ला युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने पहिले राष्ट्रीय अधिवेशन हे नागपूर येथे घेण्यात येणार असल्याणे सर्व पत्रकार बाधवानी मेहनतीने काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश गचकरवार यांनी यावी राळेगाव तालुक्यातील पत्रकार संघटनेच्या सदस्यांना सांगितले की आपला लढा हा सर्वसामान्य जनतेसाठी असून शेतकरी गोर गरीब मजूर यांच्या ज्या समस्या याबाबतीत आपल्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुका व जिल्हा स्तरावरून उठाव करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना उचलून धरावे व त्या बाबतीत प्रशासनाची लढा करावा,कारण की आपली ही संघटना आहे.
ती सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी असून आणि आपण पत्रकार म्हणून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उचलून त्यांना कसा न्याय देता येईल यासाठी लढावे त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मी काय करायचे ते मी करेल. आपली ही संघटना ही फक्त नावापुरती नसून ती गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. त्यासाठीच हा लढा उपलब्ध करून प्रत्येकाला न्याय कसा मिळेल व आपल्या संघटनेचे कार्य व नाव कसे पुढे जाईल यासाठीच मी ही संघटना उभी केली आहे. मला स्वतःचे नाव करायचे नसून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचे आहे असे श्री गणेश भाऊ कचकलवार यांनी सांगितले.अवघ्या एक वर्षात आपली ही संघटना संपूर्ण भारतभर पसरली असून आपल्या संघटनेचे जवळपास 50 हजाराच्या वर सदस्य झाले असून पुढील अधिवेशन हे मुंबई व दिल्लीला ठेवू अशी त्यांनी सांगितले.
यावेळी राळेगाव तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्यांनी त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची उचल करून सर्वसामान्य जनतेला कसा न्याय मिळवून द्यायचा असेल यासाठी प्रयत्न करू व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उचलून धरू असे ग्वाही दिली. तसेच पुढील वर्षात राष्ट्रीय युवा युवा ग्रामीण पत्रकार संघटना ही सर्व स्तरावर कशी उंच करण्यात येईल याबाबतीतही कार्य करू असे राळेगाव युवा ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फ सांगण्यात आले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उचलून व सर्व सामान्य जनतेच नाळ ठेवून सर्वसामान्य जनतेला कसा न्याय मिळेल यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करू यासाठी आपल्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे.
असे राळेगाव तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे राष्ट्रीय अध्यक्षाला ग्वाही देण्यात आली.यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष लक्षमण टेकाडे, यवतमाळ जिल्हा सचिव पुरुषोत्तम कुडवे ,जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर, राळेगाव तालुका अध्यक्ष खुशाल वानखेडे, तालुका सचिव शंशीम कांबळे, तालुका प्रसिद्धीप्रमुख अरविंद कोडापे, कार्याध्यक्ष उमेश कांबळे, गोपीचंद ढाले, लोकेश दिवे, गणेश हिवरकर, असलम पठाण ,शंकर पंधरे ,जगदीश गोबाडे संघटनेचे आधारस्तंभ महादेव तुरणकर, गजानन सुरकर, उपासराव भोयर, मारुती ठाकरे हे उपस्थित होते.