जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर -: माझी वसुंधरा भाग ५.० या अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुले येथे वर्ग १ ते ४ च्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी झाडे संवरधन करण्याचा संक्लप केला.चिमूर शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुले यांनी माझी वसुंधरा अभियानामधे सहभाग घेतला असून ऊर्जा संवर्धनाचे महत्व लक्ष्यात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये ते रुजवावे.शिवाय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धन या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला,चित्रकला स्पर्धेला विस्तार अधिकारी तुळशीदास महल्ले,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीहरी सातपुते,उपाध्यक्ष रवींद्र बावनकर,मुख्याध्यापिका छाया खोब्रागडे,मंचावर उपस्थित होत्या,यावेळी तुशिदास महाल्ले यांनी वसुंधराचे महत्व,वायू प्रदर्शन,अन्नसाखळी,वन्यजीव स्वरक्षन,पर्यावरण संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी चिमूरचां इतिहास हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षिका सरिता गाडगे तर आभार प्रदर्शन सोनू कामडी यांनी केले.