गोरगरिबांचे बुडाले रोजगार, दुकानदारांवर आली उपासमारीची पाळी
नगर परिषद अतिक्रमण धारकांना दुकानासाठी जागा उपलब्ध करून देणार का ?
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात आज दिनांक. २० जानेवारी २०२५ ला नगर परिषदेचा अतिक्रमण धारकांच्या दुकानावर बुलडोझर चालविण्यात आला.चिमूर नगर परिषदेने अतिक्रमण धारकांना २ नोटीस बजावली असून यात अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याची अंतिम मुदत दिनांक १९/०१/२०२५ पर्यंत दिली होती.व दिनांक २०/०१/२०२५ ला चिमूर नगर परिषदने चिमूर नगर परिषदेचे कर्मचारी व चिमूर ,भिसी, शंकरपुर, शेगाव,चंद्रपूर येथील पोलीस पथक बोलावून एकुण ७७ पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा यावेळी उपस्थित करण्यात आला होता.
अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषदेने दोन टिम तयार करून एक टिम राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई या महामार्गाने तहसील कार्यालय,बस स्थानक कडील बाजू बघण्यासाठी पाचारण केले. व दुसरी टिम चिमूर शहरातील जुनी मेन दुकान लाईन ते नेहरू चौक व पंचायत समिती पर्यंत अतिक्रमण काढण्याकरीता पाचारण केले.मात्र अतिक्रमण काढतांना भेदभाव करण्यात आला अशी चर्चा ठिक – ठिकाणी चिमूर शहरात अतिक्रमण धारक करतांना दिसत होते.काही तर म्हणत होते कि श्रीमंताचे ठेवले झाकून आणि गरीबांचे पहावे वाकुन अशी जुनी मण आहे ती नागरिकांच्या बोलन्यातून दिसून आले.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज होती.