jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर येथे पुरोगामी महिला मंच चिमूरच्या वतीने महिला दिनानिमित्य वैशिष्टपूर्ण सुंदर सामाजिक बांधिलकी जोपासणारा महिला दिनाचा कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय येथे संपन झाला.
जागतिक महिला दिनानिमित्य दिनांक १० मार्च रोजी राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय चिमूर येथे पुरोगामी महिला मंच चिमूरच्या वतीने महिला दिनानिमित्य वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक बांधिलकी जोपासत महिला दीन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीता ठाकरे,प्रमुख पाहुणे म्हणून ज्योत्स्ना बावनकर,कलावती महाजन,मुख्याध्यापक रामदास कांमडी सत्कार मूर्ती माधुरी काळे,मुरकुटे मॅडम,पेटकर मॅडम,अरुणा लुथडे,खान मॅडम मंचावर उपस्थित होत्या,विद्यादायिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,आकर्षक अशा स्वागत नृत्याने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलावती महाजन यांनी केले. ज्योत्स्ना बावनकर यांनी स्त्री व तिचा आजतागायत सुरू असलेला संघर्ष यावर सखोल मार्गदर्शन केले.दिव्यांग क्षेत्रातील थोर समाजसुधारक हेलन केलर व लूईस ब्रेल यांचे फोटो मुक बधीर शाळेला भेट देण्यात आले व त्याचे अनावरण करून पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी रजिस्टर पेन व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. प्राविण्य प्राप्त शिक्षक महिलाँचा पाहुण्यांच्या हस्ते सेवानिवृत झालेल्या उच्च श्रेणी म्हणून प्रमोशन झालेल्या शिक्षक महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन प्रद्न्या मॅडम व आभार प्रदर्शन वैशाली डवले यांनी केले. महिला दिनाच्या कार्यक्रमाला बहुसंख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.