Breaking News

पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधम बापास जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आठ दिवसांची पोलीस कोठडी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

याआधीही त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे होते दाखल

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- दिनांक- ३१/०५/२०२५ वार शनिवार या बाबत सविस्तर वृत्त असे कि बापानेच केला स्वतःचे अल्पवयीन मुलीवर बलात्कार फरार झालेल्या आरोपीला शेवगाव पोलीसांनी २४ तासाचे आत सापळा लावुन केले जेरबंद. फिर्यादी अल्पवयीन मुलगी हिचे वडील आरोपी नामे एकनाथ जयराम भोसले वय ५४ रा.हिंगणगाव ता. शेवगाव जि.अहिल्यानगर याने फिर्यादी / पिडीत अल्पवयीन मुलगी हिस हिंगणगाव गावातील उसाचे शेतात घेऊन जाऊन तिस चाकुचा धाक दाखवुन जिवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी/ पिडीत मुलगी सोबत बळजबरीने शारीरीक संबंध करुन बलात्कार केल्याचे फिर्यादीवरुनदि.३०/ ०५ /२०२५ रोजी रात्री ०१/०५ वा. शेवगाव पोलीस ठाणे गु. र. नं. ४८५/२०२५ भारतीय न्याय संहिता क ६४ (२) ६५ (१) लैगिंक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधि. कलम . २०१२ चे कलम ४, ६, ८ १० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.गुन्हा झाल्यापासुन आरोपी एकनाथ जयराम भोसले हा फरार होता.

पोलीस निरीक्षक, समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना दि. ३०/०५/२०२५ रोजी गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की आरोपी हा बाहेरगावी जाणेचे तयारीत आहे.पोलीस निरीक्षक, समाधान नागरे यांनी पथक तयार करुन आरोपी हा भातकुडगाव फाटा, नेवासा रोड कडे ट्रकने पळुन जात असतांना पोलीसांनी शिताफितीने ताब्यात घेवुन शेवगाव पोलीस ठाण्यास आणुन नमुद गुन्हयात अटक केले. यापुर्वी शेवगाव पोलीस स्टेशन येथे वरील नमुद आरोपी याचे विरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. सदरची कारवाई नवनिर्वाचित पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अहिल्यानगर,अपर पोलीस अधिक्षक,प्रशांत खैरे,अहिल्यानगर,उपविभागीय पोलीस अधिकारी, सुनिल पाटील उपविभाग शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली शेवगांवचे कर्तव्यदक्ष पो.नि.समाधान नागरे, पोसई प्रविण महाले, पोहेकॉ/किशोर काळे, पोहेकॉ/ चंद्रकांत कुसारे, पो कॉ. शाम गुंजाळ, पोकॉ. राहुल खेडकर, पोकॉ. धनेश्वर पालवे, पोकॉ. संपत खेडकर,पोकॉ. संतोष वाघ तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पो कॉ. राहुल गुडडु व पो कॉ. शिंदे यांनी केली असुन वरील गुन्हयाचा तपास स.पो.नि.अशोक काटे हे करत आहेत.

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

लिफ्ट देऊन प्रवाशाला लुटणा-या जबरी चोरीतील चोरट्यांना रामनगर पोलीसांनी केले गजाआड

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar “दोन्ही आरोपींना केली अटक, १,२८,०००/-रूपयांचा मुद्देमाल जप्त” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल …

सुसज्ज इमारत डॉक्टरविना आरोग्यविभाग झोपेत

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved