jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
“दोन्ही आरोपींना केली अटक, १,२८,०००/-रूपयांचा मुद्देमाल जप्त”
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- दिनांक- २९/०५/२०२५ रोजी दुपारी ०३.३० वा. बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथून चामोर्शी, जि.गडचिरोली कडे जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेला गोपेश गोविंद कुंडू, रा. नरेंद्रपूर, पोस्ट गुंडापल्ली, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यास शाईन मोटारसायकलवरील दोन व्यक्तींनी त्यास कुठे जायचे आहे असे विचारून तुला बल्लारशाह येथे सोडतो असे सांगून त्यांचे मोटारसायकलवर बसवून बल्लारशहा येथे न नेता जुनोना चौक ते जुनोना गाव जाणारे डांबरी रोडलगत जंगलातील झाडाझुडपात नेऊन त्यास मारहाण करून त्याचे कब्जातील मोबाईल, सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला बाबतचे रिपोर्टावरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्र. ४२४/२०२५ कलम ३०९ (६), ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये जबरी चोरीचा अपराध दाखल केला होता.
सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा (१) स्मित राजेश्वर कोटे, वय ३० वर्षे, व (२) प्रकाश भुरेलाल कबीरदास, वय ३१ वर्षे, दोघे रा. बल्लारशाह, ता. बल्लारशाह जि. चंद्रपूर यांनी केला आहे. त्यानुसार त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे मागावर राहून त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचेकडून सदर गुन्ह्यातील गेला मालातील फिर्यादीचा मोबाईल, रोख रक्कम व सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यातील वापरलेली मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १,२८,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक केली आहे.
वरील कारवाई ही पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस अंमलदार जितेंद्र आकरे, शरद कुडे, आनंद खरात, लालू यादव, प्रशांत शेंदरे, पेतराज सिडाम, सचिन गुरनुले, मनिषा मोरे, रविकुमार ढेंगळे, संदिप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.