Breaking News

महिलेच्या गळयातील सोन्याची चैन चोरणारा पोलीसांच्या ताब्यात

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

” एका विधी संघर्ष बालकासह एक आरोपीस अटक “

” सोन्याची चैन १,५०,०००/- रुपये किंमतीची पोलीसांनी केली जप्त “

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- आज दिनांक २०/५/२०२५ रोजी २०:०० ते २०:३० वाजता दरम्यान शास्त्रीनगर वार्ड भद्रावती येथे फिर्यादी महिलेच्या गळयातील सोन्याची जबरीने हिसकावुन चोरुन नेल्याचे तक्रारीवरुन पोस्टे भद्रावती येथे अप.क्र. २४६/२०२५ कलम ३०९ (४) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपी नामे थॉमस अशोक दुधे वय १९ वर्ष रा. नविन सुमठाणा (२) दानीश बेग रा. डोलारा तलाव भद्रावती आणि एक १७ वर्षीय विधी संघर्ष बालक असे मिळून सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी क्र. १) थॉमस अशोक दुधे व विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेवुन त्यांच्या कडुन गुन्हयातील चोरुन नेलेला १५ ग्रॅम सोन्याची चैन किंमत १,५०,०००/- रुपयाचा हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांचे मार्गदर्शनाखाली भद्रावती ठाणेदार पोनि श्रीमती लता वाडीवे याचे नेतृत्वात पोउपनि गजानन तुपकर, सफौ महेंद्र बेसरकर, पोहवा अनुप आस्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, पोअं खुशाल कावळे, योगेश घाटोळे सर्व पोस्टे भद्रावती यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

महाराष्ट्र पत्रकार संघाचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- महाराष्ट्र पत्रकार …

कोंबड बाजारावर पोलीसांचा छापा

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar ” कोंबडाची झुंज लावुन जुगार खेळणारे ७ आरोपी अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved