Breaking News

कोरम अपूर्ण असल्याने आमसभा स्थगित

विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरपंचाच्या निर्णयाचा केला विरोध

पत्रकार :- नागेश बोरकर (दवलामेटी)

दवलामेटी :- गावातील लोकसंखेचा १५% किंवा १०० लोकांची उपिस्थिती आमसभेला असणे आवश्यक आहे या नियमाचा पालन करून दवलामेटी ग्रामपंचायत चा सरपंच सौ रीता उमरेडकर ने आमसभा तहकूब केल्याने विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निर्णयाचा निषेध केला व सरपंच मुर्दाबाद असे नारे देखील लावले परंतु कुठल्याही दबावाला न जुमानता संविधानाचा मान राखून ठोस निर्णय घेतल्या मुळे दवलामेटी ग्रामपंचायत ला नियमाला धरून योग्य निर्णय घेण्यास सक्षम अशी महीला सरपंच प्रथमच दवलामेटी ग्रामपंचायत लाभल्याची चर्चा गावात सुरू झाली.
ग्रामपंचायत अधिनियम नुसार ऑगस्ट महिन्यात आमसभा घेणे अनिवार्य आहे त्यानुसार ३१ तारखेला सकाळी अकरा वाजता आमसभे चे आयोजन सरपंच मॅडम ने केला होता त्यासाठी ७ दिवसा अगोदर पासून गावात दवंडी पिटून आमसभेची माहिती देण्यात आली होती सभेला महत्वाचा समित्या गठीत करायचे होते ज्यासाठी गावकऱ्यांची पुरेपूर उपस्थिती अनिवार्य होती. एक तास वाट बघितल्या नंतर ही कोरम पूर्ण न झाल्याने १२ वाजता पर्यंत फक्त ५९ लोकांची उपस्थिती होती, शेवटी सरपंच सौ रीता ताई उमरेडकर यांनी सभा तहकूब केली. येणाऱ्या ११ तारखेला सकाळी ११ वाजता पुन्हा तहकूब सभा घेण्यात येईल अशी माहितीयावेळी सरपंच मॅडमने दिली. परंतु विरोधी गटाचा कार्यकर्त्यांनी निर्णयाचा पूर्ण तक्तिनिशी विरोध केला व सरपंच विरोधी नारे बाजी पण केली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर 20 एप्रिल रोजी शेवगाव शहर झाले भगवे मय

* सकल हिंदू समाज शेवगाव शहर आणि तालुका तर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन “जय श्रीराम” च्या …

वन्यप्राण्यांच्या नुकसानीचे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईचा फायदा घ्यावा – विठ्ठलराव बदखल

रिवार्ड्स संस्था येथे एक दिवसीय शेतकरी यांचे प्रशिक्षण तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड:-समाज प्रगती सहयोग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved