
प्रतिनिधी नागपूर
नागपुर :- कन्हान नदीत पोहायला गेलेले पाच युवक बुडाल्याची घटना समोर आली आहे. कामठी येथील अम्माचा दर्गा येथे सुरु असलेल्या ‘उर्स’मध्ये सहभागी होण्यासाठी यवतमाळहून एकूण दहा तरुण आले होते. दहा जणांपैकी पाच तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. युवकांचा शोध घेण्याचे प्रयत्न कन्हान नदीपात्रात सुरु आहेत.
यवतमाळहून दहा मित्रांचा ग्रुप नागपूरला आला होता. हे तरुण 19 ते 21 वर्ष वयोगटातील होते. कामठी येथील अम्माचा दर्गा येथे सुरु असलेल्या ‘उर्स’मध्ये सहभागी होण्यासाठी ते आले होते. यावेळी कन्हान नदीपात्रात उचलून पोहण्याचा मोह काही जणांना झाला. मात्र पोहायला गेलेल्या पाच युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. सगळे युवक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचे असल्याची माहिती आहे.
बुडालेल्या तरुणांची नावे
1. सय्यद अरबाज, वय 21 वर्ष
2. ख्वाजा बेग, वय 19 वर्ष
3. सप्तहीन शेख, 20 वर्ष
4. अय्याज बेग. 22 वर्ष
5. मो. आखुजर, 21 वर्ष