Breaking News

वाघीण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात तात्काळ चौकशीची मागणी

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खडसंगी बफर झोन मध्ये वनकर्मचारी गस्तीवर असतांना वाघीण चे तिन बछडे अशक्त अवस्थेत आढळुन आले.त्यातील एक बछडा मरण पावला. दोन बछड्याची आई मयुरी वाघीणीचा शोध घेण्यासाठी वनकर्मचा-यांनी वन श्रेत्रात पायपीट केली परंतु थांग पात्रता लागेना. कित्येक महिन्यांपासून वाघीण बेपत्ता आहे याचाच अर्थ घातपात झाल्याचा संशय बळावला आहे.खडसंगी बफर झोन लगत कोलारा कोअर , मदनापुर बफर , पळसगाव बफर ,रामदेगी क्षेत्र लागुनच आहे परंतू त्याही परिसरात वाघीण बेपत्ता असल्याची चिन्हे दिसत आहे.

ज्या परिसरात वाघीण ने बछड्यांना सोडलं याच परिसरात घातपात झाल्याचा संशय बळावला आहे. शिकार होऊन अवयवांची तस्करी सुद्धा होऊ शकते. याच परिसरात वाघीण वर विद्युत प्रवाह चा वापर करुण घातपात झाल्याचा संशय बळावला आहे.असे अनेक प्रकारचे संशय या प्रकरणात निर्माण झाल्याने वनविभागाने तपासाची चक्रे वेगाने फिरविण्याची गरज आहे.या परिसरात वन्यजिवांची शिकार करणा-यांच जाळ मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी वन्यजिवप्रेमी कवडू लोहकरे यांनी केली आहे.

” चिमूर परिसरात शिका-यांची टोळी सक्रिय आहे.लहान पिल्लांना सोडून जाण व परत न येणं संशयास्पद आहे.इतक्या कमी वयात वाघीण पिल्लांना सोडुन जाऊ शकत नाही. तपासाची चक्रे फिरवावित.”

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

तीन अल्पवयीन मुलींना गावातीलच एका भामट्याने फुस लावून पळून नेले-पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-दिनांक 25 एप्रिल 2024 वार गुरुवार याबाबत सविस्तर वृत्त असे …

विद्यार्थ्यांचा संस्कार शिबिरातून सर्वांगीण विकास शक्य -वाय. सी. रामटेके

सुसंस्कार शिबिर प्रारंभ जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- एप्रिल महिन्यात परिक्षा संपली की विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved