
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
घुग्घुस :- घुग्घुस येथील नगर परिषदेच्या गोदामाला आज पहाटे सकाळी 5 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली त्यामुळे परीसरात एकाच खळबळ उडाली, घटनेची माहिती मिळताच एसीसी कंपनीच्या अग्नीशमन दलाने घटना स्थळावर गाठून आग विझविण्यात आली,घुग्घुस नगर परिषदेच्या गोदामाला विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.परीसरातील नागरिकांमध्ये तर्क वितर्क लावल्या जात आहे.
नगर परिषेदेच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घटनास्थळाला भेट दिली नगर परिषेदेचे कर्मचारी हरिभाऊ जोगी, सुरज जंगम, विठोबा झाडें,आणि इतर कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन नगर परिषदेच्या गोदामाला आग लागलेल्या खोलीमधिल सामान आपल्या जिवाची पर्वा न करता बाहेर काढले. एसीसी कंपनीच्या अग्निशमन दलाचे इंचार्ज जोंगीदर व त्यांच्या सहकारी चमुला आग विझविण्यात यश मिळविले. नगर परिषेदेच्या कर्मचाऱ्यांनी गोदामाला- आग लागल्याची माहिती तहसीलदार निलेश गौड व मुख्याधिकारी अर्शीया जुही यांना दिली, गोदामाला आग लागल्याने घटनास्थळी बाजारातील दुकानदार व नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.