Breaking News

वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

सिंदेवाही :- पळसगांव वनपरिक्षेत्र मधील पिपर्डा वनपरिसरात कक्ष क्र. ५६३ मध्ये घडली घटना, सिंदेवाही तालुक्यातील खांडला येथील एक तरुण शेतकरी आपली स्वतःची (जनावरे) गुर चराईला गावाजवळच्या शेतीला लागुन असलेल्या जंगल परिसरात नेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला,

या हल्यात खांडला येथील अनिल पांडुरंग सोनूले वय ३६ वर्षे हा तरुण शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना पळसगांव वनपरिक्षेत्र मधील पिपर्डा या गावातील कक्ष क्रं. ५६३ येथील दुपारी ३.३० वाजताची घटना असून सदर प्रेत शवविच्छेदन करण्याकरिता प्रेत सिंदेवाही येथे नेण्यात आले आहे, घटनास्थळी वनपाल किलनाके, ठाकरे मॅडम पिपर्डा, दांडेकर वनरक्षक, व वनमजुर उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved