
नागपूर दि. 24 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी 16 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर 2021 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी ची परीक्षा 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. परीक्षार्थीना तणावमुक्त वातावरण परीक्षा देण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर कोणतेही गैरप्रकार व आवारात गर्दी टाळणे, महत्वाच्या विषयाच्या पेपरच्या दिवशी उपद्रवी केंद्रांना आकस्मिक भेटी देवून गैरप्रकारांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी वर्ग अ व वर्ग ब अधिकाऱ्यांची दक्षता पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती लंगडापूरे उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.1, श्रीमती ए. एस. जाधव नायब तहसिलदार, संगायो जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर . एस. झेड. भोतमांगे नायब तहसिलदार, योगीता यादव नायब तहसिलदार यांच्या समावेश करण्यात आला आहे.
दक्षता पथकाने जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर महत्वाच्या विषयाच्या पेपरच्या दिवशी उपद्रवी केंद्राना आकस्मिक भेटी देवून मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करावी, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी विजया बनकर यांनी कळविले आहे.