
मौदा माथनी टोल नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस चे आंदोलन
नागपूर :- मौदा माथनी टोल नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस चे आंदोलन
मौदा ता प्र।राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 नागपूर भांडार महामार्गावर पडलेले खड्डे पेट्रोल पंप ढाबे कम्पन्या समोर होणारी अवैध पार्किंग साईड रोड ची दुरवस्था बंद असलेले पथदिवे यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, एकीकडे नागरिकांकडून टोल वसूल केला जातो पण टोल प्रशासनाकडून महामार्गावर सुविधा पुरविल्या जात नसल्यामुळे नागपूर जिल्हा राष्ट्रवादी चे जिल्हा अधेक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या नेतृत्वात आज माथनी टोल नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यापूर्वी अनेकदा नाका प्रशासनाला निवेदने देऊन त्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे आज गुजर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार, अविनाश गोतमारे,शोएब असद, आशिष पाटील , सोपान गभाने शाम वाडीभस्मे, विकी येरणे, विजय पांडे, नौशाद सिद्देकी, आणि राष्ट्रवादीचे शेकडो कार्येकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी कार्येकर्त्यांनी काही काळ महामार्गावरील वाहने रोखून धरली यावेळी नाका वेवस्थपक यांनी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले व महामार्गावर आवश्यक त्या सुविधा त्वरित पुरविण्यात याव्या अन्यथा येणाऱ्या काळात हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिवराज बाबा गुजर, यांनी दिला आहे.