जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
भद्रावती :- खापरी वाई गाव मल्हारीबाबा सोसायटी व आजुबाजुच्या परीसरात मागील दहा – बारा दिवसापासून मल्हारीबाबा सोसायटी खापरी रामटेके सोसायटी कटारीया ले आऊट येथे रोज रात्री अकराच्या सुमारास बिबट्याचा वावर असून त्यामुळे परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . तसेच नागरिकाच्या जिवाला पण धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे या संदर्भात वनक्षेत्रपाल भद्रावती यांना निवेदन देण्यात आले असून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देतांना आशिष ठेंगणे, विनोदजी गावंडे ,संतोष झोडे , विनोद जॉन्सन ,अमोल कुचेकर आदी उपस्थित होते.