
जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर
चिमूर :- तळोधी बा. वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत नेरी उपक्षेत्रात चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथे एका चितळासह तिन वन्यप्राण्याचे सांगाळे सापडल्याने वनविभागात खळबळ पसरली आहे.
ही घटना 25 तारखेला मोटेगाव येथील जंगलालगत असलेल्या फुटका तलावावावर घडली.आश्चर्य म्हणजे एकाच ठिकाणी चार प्राण्याचे अवशेष आढळले.हे अवशेष अंदाजे 2 महिण्याचे असल्याचा अंदाज आहे.
गावातील काही लोक शेतात जात असतांना वन्यप्राण्याचे अवशेष दिसले.याची माहीती तळोधी बा. वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिली. वनविभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सुरुवातीला चितळ्यांच्या सांगाळ्याचा तपास करण्यात आला.
परंतु नंतर पुन्हा तपासाची चक्रे फिरविल्यानंतर चक्क तलावाच्या सांडव्यात दोन वन्यप्राण्याचे अवशेष मिळाले. परंतू त्यामधील काही अवयव मिळाले नाही त्यामुळे हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
वनविभाने चितळासह इतर वन्यप्राण्यांचे अवशेषाचा पंचनामा करण्यात आला व अवशेष खड्डा करुन गाढण्यात आले. चितळाची चामडी व दोन वन्यजिवांचे अवशेष डि .एन .ए.साठी पाठविण्यात आली.
यावेळी मोटेगाव -काजळसर क्षेत्राचे,
क्षेत्र सहाय्यक रासेकर,पर्यावरण संवर्धन समीती अध्यक्ष कवडू लोहकरे,सामाजिक कार्यकर्ते,अजीत सुकारे,अतुल सुकारे, आदी उपस्थित होते.
एका चितळासह तिन वन्यजिवांचे डोके सापडणे संशयास्पद आहे. शिकार झाल्याचा संशय बळावला आहे.कदाचित शिका-याचं फार मोठं जाळं असल्याचा संशय आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी – कवडू लोहकरे