Breaking News

लॉंगमार्च प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर

-नागपुरात प्रकृती असवस्थेनंतर अँजियोप्लास्टीद्वारे यशस्वी शस्त्रक्रीया-

-पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांची माहिती-

नागपूर :-२८ सप्टेंबर लॉंगमार्च प्रणेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि कवाडे सर यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी मंगळवारी  दिली आहे. शनिवारी प्रकृती अस्वस्थतेमुळे प्रा.कवाडे सरांना रामदासपेठ येथील नामांकित अरनेजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

विविध तपासण्याअंती मिळालेल्या निष्कर्षानंतर ह्रदयातील ब्लॉकेजेसमुळे प्रा.कवाडे सरांवर अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. जसपाल अरनेजा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची एक विशेष टीम प्रा.कवाडे यांच्या उपचार करीत आहे. शस्त्रक्रियेनंतर प्रा.कवाडे यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारांना ते उत्तम प्रतिसाद देत आहेत. लवकरच ते संघटना कार्यात नव्या ऊर्जेने रूजू होती, अशी माहिती जयदीप कवाडे यांनी दिली आहे. असंख्य कार्यकर्ते,पदाधिकारी तसेच संघटनेचे प्रेम आणि आशिर्वाद सरांच्या पाठिशी असल्याने ते लवकर ठणठणीत बरे होतील, असे जयदीप कवाडे म्हणाले.

९९ टक्के ब्लॉकेएज
रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्वप्रथम अँजियोग्राफी करण्यात आली.यात ९९ टक्के ब्लॉकेएज आढळून आल्याचे समाजताच डॉ. जसपाल अरनेजा यांनी जयदीप कवाडेंशी चर्चा करून अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचे सुचिवले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved