Breaking News

चिमूर येथील अपघातात महिलेचा मृत्यू तर दुसरा किरकोळ जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- आज दिनांक 01/10/21 रोजी सकाळी 10/55 वाजता सुमारास मौजा कोलारी ता. चिमूर येथील मधुकर गुलाब जोंधुळकर हे आपल्या दुचाकी मोटार सायकल क्रमांक MH 49 BP 9599 या वाहनावर आपली आई सुमनबाई वय 65 वर्ष, हिला मागे बसवून जांभूळघाट वरून चिमूरकडे येत असतांना चिमूर येथील गुरुदेव मंगल कार्यालय समोर समोरून येणारे टँकर आयसर क्रमांक MH 34 BG 1421 च्या चालकाने आपले ताब्यातील वाहन निष्काळजीपणे व लापरवाहीने चालवून मोटार सायकलीस धडक दिल्याने अपघात होऊन मोटार सायकलचे पाठीमागे बसलेली फिर्यादीची आई सुमनबाई ही गंभीर जखमी होऊन मरण पावली. सदर घटनेसंबधात पोलीस स्टेशन चिमूर येथे अप क्रमांक 436/2021 कलम 279, 304(अ) भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अलीम शेख व पोलीस अंमलदार राहुल चांदेकर करीत आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरमध्ये होणार हेरिटेज वॉकचे आयोजन

नागपूर दि. 25 : ऐतिहासिक शहर म्हणून नावलौकीक असलेल्या नागपूर शहरात गोंड कालीन व भोसले …

पतीने टाकले पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते तेल

प्रतिनिधी नागपूर नागपूर :- पत्नीवर असलेल्या संशयावरुन एका पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते तेल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved