
न्यायाधीशांनी दिला आरोपीला एक दिवसाचा PCR
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील अक्षय सूर्यभान गिरडे यांची शेती कोरा रोडला लागून आहे शेतमालाच्या
पिकाचे संरक्षणासाठी स्वतःच्या शेतामध्ये सौरऊर्जेवर चालणारे मशीन ज्याची अंदाजे किंमत 3500 रु. व बॅटरी अंदाजे किंमत 3500 रु. चे लावलेले होते. हि मालमत्ता दिनांक 29/09/2021 ला दुपारी 2/00 वाजताच्या सुमारास अज्ञात चोराने चोरून नेली. अक्षय सूर्यभान गिरडे यांच्या तक्रारीवरून चिमूर पोलीस स्टेशन येथे अप क्रमांक 435/2021 कलम 379 भा.द.वि. दिनांक 30/09/21 नुसार गुन्हा नोंद करण्यात आली असून चोरीस गेलेली मालमत्ता व अज्ञात चोराचा शोध घेण्याकरिता चिमूर पोलीसांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना होऊन संशयीत आरोपी नामे संदीप पुरुषोत्तम दडमल रा. खडसंगी यास गुन्ह्यात अटक करून त्यांचेकडून चोरीस गेलेली मशीन हस्तगत करण्यात आली. आरोपीस आज दिनांक 01/10/21 रोजी मा. प्रथम श्रेणी न्यायालय चिमूर येथे करण्यात आले असून चोरीस गेलेली बॅटरी हस्तगत करण्याकरिता मा. न्यायाधीशांनी आरोपीचा एक दिवसाचा PCR मंजूर केलेला आहे. पुढील गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार सोनवणे व पोलीस अंमलदार मनोज ठाकरे, प्रवीण गोन्नाडे करीत आहेत.