सावली :- सावली गावातील शिवमंदिर प्रचलित असून गावातील नागरिक शिवमंदिरात पुजा अर्चना करण्याकरिता दिलीप बोरकर यांच्या घराजवळ शिवमंदिरात जात असते, परंतु हा रस्ता कच्चा असल्याकारणाने पावसाळ्यात नागरिकांना येण्या-जाण्या करीता खूपच त्रास सहन करावा लागतो, सिमेंट रस्ताच्या बांधकामासाठी कित्येक वर्षा पासून सावली ग्रामपंचायतीला अर्ज सादर केली जात आहे परंतु गावकऱ्यांच्या या मागणीकडे निवेदन देऊनसुद्धा सरपंच व सदस्यांचे गावातील समस्याकडे जाणीव पूर्व दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे निवेदनाची प्रतीलीपी खालील प्रमाणे देण्यात आली आहे,
१) बांधकाम विभाग जि.प.वर्धा
२) B.D.O. पंचायत समिती वर्धा
३) जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा
४) ग्रामपंचायत सावली
आता तरी सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू होणार का याकडे सर्व सावली वासीयांचे लक्ष लागले आहे.
Check Also
सुधीर मुनगंटीवार साठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी
*मविआच्या स्टंटबाजीला कोसंबीतील महिलांचे आक्रमक प्रत्युत्तर, हल्लेखोरांची पळापळ* *‘लाडकी बहीण’ हिट झाल्याने मविआचा रडीचा डाव* …
बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल
मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : लोकशाही प्रक्रियेमध्ये …