Breaking News

प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या निर्माणाधीन इमारतीला लागली भीषण आग – आपचे राजु कडे यांचा आरोप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर- चंद्रपूर शहरातील पागल बाबा नगर येथील चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या निर्माणाधिन इमारतीला मंगळवारच्या रात्रो ७:३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती, या घटनेची माहिती आप चे शहर सचिव राजु शंकरराव कुडे यांना मिळताच आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घटना स्थळी उपस्थित झाले. आणि घटनेची प्रत्यक्ष दर्शनी उपस्थित कामगारांन कडून संपूर्ण माहिती घेतली. कामगारांनी संगितले की तिथे सुरक्षा संबंधित असणारे कोणते ही उपाययोजना केलेल्या नव्होत्या जसे की अग्निशमन वाहन, फायर सिलेंडर, इत्यादी उपकरणाची व्यवस्था तेथील व्यवस्थापकांनी केलेली नव्होती.

जर तिथे फायर ब्रिगेडची वाहन हजर असती तर हि आग आटोक्यात आणता आली असती परंतु कंपनीच्या व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हि आग लागली या आगीत सुदैवाने कुठली हि जिवितहानी झाली नाही, परंतु अशी काही घटना घडली असती तर याला जबाबदार कौन असते.? असा प्रश्न आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे करण्यात आला आहे.

तसेच या आगीत कामगारांचे खुप आर्थिक नुकसान झाले असून त्यांचे महत्वाचे कागदपत्र पूर्णपणे जळाले असून त्यांची प्रशासनाने तात्काळ मदत करावी. अन्यथा आम आदमी पार्टी चंद्रपूर शहर तसेच जिल्हा मिळून कामगारांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असे आपचे शहर सचिव राजुभाऊ कुळे यांनी आव्हान केले आहे. तसेच संबधित दोषी अधिकारी व व्यवस्थापकावर कडक कारवाई करण्यात यावी. जेणेकरून भविष्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही. यावेळी आपचे शहर सचिव राजु शंकरराव कुडे, बाबुपेठ प्रभाग सहसण्योजक निखिल बारसागडे, चंदु भाऊ माडुरवार, अंकूश राजूरकर, हितेश धोकडे, जयदेव देवगडे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

तीन अल्पवयीन मुलींना गावातीलच एका भामट्याने फुस लावून पळून नेले-पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-दिनांक 25 एप्रिल 2024 वार गुरुवार याबाबत सविस्तर वृत्त असे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved