
पाच आरोपी सह एक लाख 38 हजाराचा मुद्देमाल जप्त
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
भद्रावती :- सुरक्षा नगर मध्ये जुगार खेळत असतांना पाच आरोपीला अटक करून एक लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त ही कारवाई सायंकाळच्या सुमारास करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले व्यक्ती दिलीप पारखी, विलास पारखी, श्रावण झाडे,जितेंद्र मुरस्कर, प्रशांत कडके अशी असून सर्व जण राहणार भद्रावती येथील आहे,
आरोपी सुरक्षा नगर येथील खुल्या जागेवर पैशाची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली, मिळालेल्या माहितीनुसार ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तुळजेवार, शशांक बद्दमवार, पाटील, मून यांनी कारवाई केली. आरोपी कडून 38 हजार रोख रक्कम व दोन दुचाकी असा एक लाख 38 हजाराचा मुद्देमाल जप्त केला यातील पाचही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.