Breaking News

एका विवाहितेची राहत्या घरी आत्महत्या

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

शंकरपुर :- येथील वॉर्ड नंबर 3 मध्ये रहिवासी असलेल्या एका विवाहितेनी आपल्या राहते घरी आत्महत्या केली असून ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडली, जानू बादल मंडल वय 22 असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून दीड वर्षाआधी बादल बाबूलकुमार मंडल याच्याशी विवाह झाला होता. नवरात्री चा पहिला दिवस असल्याने घरी घटस्थापनाची तयारी सुरू होती, याच वेळेस या महिलेने घरातीलच स्वयंपाक रूम मधील फंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केली, घरच्या लोकांना माहिती होताचं त्यांनी तिला उतरवून शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने शवविच्छेदन करण्यासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आत्महत्याचे कारण अजून पर्यंत कळले नसून घटनेचा अधिक तपास शंकरपुर पोलीस चौकीचे कर्मचारी करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved