
- जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर शहरापासून अगदी ९ कि.मीटर जवळच असलेल्या शिवापूर बंदर येथील गाव तलावात मासे पकडण्याकरीता जाळ्यात टाकले असता चक्क जाळ्यात १० फुट लांब अजगर अडकलेला मिळाला असून याबाबतची माहिती शिवापूर बंदर वासियांनी सांगितली असता,
तात्काळ धाव घेत सर्प मित्र सुहास तूरानकर राहणार बंदर कॉलनी यांनी मच्छी च्या जाळ्यात अडकलेल्या अजगर या सापास जाळ्यातून मुक्त करून ताळोबा अभयारण्य मध्ये वनपरिक्षेत्र चिमूर यांच्या माध्यमातून सोडून जिवनदान दिले.
याची शिवापूर बंदर तसेच बंदर कॉलनी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्प मित्राचे कौतुक केले जात आहे.