
दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कड़क कार्यवाही करण्याची आप ची मागणी
नागपूर :-काल रात्री 2014 मध्ये देशाचे प्रतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी भूमिपूजन केलेला उडानपुल पूर्ण तयार होण्या आधीच कोसळला. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्ट्राचार झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. आज दिनांक 20/10/2021 रोजी आम आदमी पार्टी नागपूर कडून पारडी कळमना रस्त्यावरील उड्डाणपूल निष्काळजीपणामुळे कोसळल्याच्या विरोधात आंदोलन झाले. हे आंदोलन राज्य समिती सदस्य व विदर्भ संयोजक देवेंद्र वानखडे आणि राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात झाले.
ह्या आंदोलनात प्रमुख्याने राज्य सहसचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, नागपूर सहसंयोजक डॉ जाफरी व राकेश उराडे, युवा राज्य समिती सदस्य कृतल वेलेकर आकरे, विदर्भ युवा संयोजक पीयुष आकरे, नागपूर युवा संयोजक गिरीश तितरमारे, उत्तर नागपूर संयोजक रोशन डोंगरे, विनोद खोडवे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अनियमितता करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारवर त्वरित कार्यवाही करावी, तसेच बीजेपी विरोधात नारे बाजी करण्यात आली. आम्हाला कोसळणारा विकास नको, नागपुरकरांच्या कराचा पैसा व्यर्थ करू नका, गड़करी साहेब याची चौकशी करा, अशे नारे लावण्यता आलेत.
हा पारडी कलमना रोड वरील उड्डाणपूल NHAI अंतर्गत निर्मिन करण्यात येत आहे. ह्या उड्डाणपुलाची निर्मिती 2014 पासून हळू हळू चालू आहे. यामुळे ह्या भागात कायमचा ट्राफिक जाम असतो, उड्डाणपुलाचे कार्य सुरू असल्यामुळे रस्त्याची ही परिस्थिती देखील खूप खराब आहे. पूर्ण परिसरातिल वातावरणात धुळीचा प्रादुर्भाव होवून, नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. यामुळे लोकांना श्वासाचे रोग होत आहे, रस्ते खराब असल्यामुळे लोकांचे एक्सीडेंट होतात, लोकांना मणक्याचे आजार देखील होत आहेत. ही केंद्र सरकार व राज्य सरकार कडून मोठ्या मोठ्या काँक्रीट ने बनवणाऱ्या परियोजना शहरात आणत आहेत.
पण खर्या अर्थाने शहराच्या मूलभूत विकासाकरिता शहरातल्या झोपडपट्ट्या व शहराच्या सीमेवरचे जे प्रभाग आहे, यांची परिस्थिती खूप अवघड झाली आहे. शहरातले चांगले रस्ते खोदून तिथे परत सिमेंट रस्ते बनवल्यातात. पण शहराच्या सीमे जवळच्या वस्त्या आहेत, तिथले जे प्रभाग 25 प्रभाग, 4 येथे लोकांची परिस्थिती भरपूर विकट आहे. येथे रस्ते नाही, पाण्याचे पाईप लाईन नाही, सीवर लाईन ची व्यवस्था नाही. मूलभूत गरजेसाठी लोकं त्रासले आहेत आम आदमी पार्टी कोणत्याही प्रकारच्या विकासाच्या विरोधात नाही, पण प्रस्थापित सत्ताधीशांनी हे जर जाणून घेतलं नाही की लोकांच्या मूलभूत गरजांवरती काम करणे ही त्यांची प्राथमिकता असायला पाहिजे तर जनता यांना नक्कीच लवकरात लवकर सत्ते बाहेर करेल.
या कार्यक्रमाला नानक धनवानी, सोनू फटिंग, फुलचंद किटाळीकर, बबलू मोहाडीकर, प्रतिक बावनकर, जयेश शाह, अभय भोयर, स्वप्नील शेंडे, कैलास कावला, धीरज आगाशे, सुनील बारापात्रे, विनोद कोवे, हरीश वेलेकर, शुभांगी वेलेकर, कुणाल मंचलवार, निखिल मेंडवडे, विशाल चौधरी, नसीर खान, शंकर ठाकरे, पंकज मिश्रा
मोरेस्वर मौन्देकर, पंकज मेश्राम, प्रियंका ताम्बे, स्वप्निल सोमकुंवर, प्रणाली सहारे, नंदकिशोर श्रीवास्तव, शैलेश गुर्धे, संजय चांदेकर, किशोर मौन्देकर, नरेश देशमुख, धीरज शर्मा इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.