Breaking News

शेतकरी बांधवाना तंत्रज्ञानाच्या माध्यामातून मार्गदर्शन

         जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर जिल्हया मध्ये मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड केली जाते. सध्या तरी कपाशी पिकावर अनेक कीडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या मनात कपाशी पीक कीड व रोग व्यवस्थापन बद्दल अनेक प्रश्न होते.

त्या प्रश्नांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा चंद्रपूर यांच्या मार्फत तंत्रज्ञांनावर आधारित “डायल आऊट ऑडिओ कॉन्फरन्स च्या साहिय्याने” दिनांक 21/10/2021 रोजी कपाशी पीक कीड व रोग व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशन चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी धम्मदीप गोंडाने व कार्यक्रम सहाय्यक अमित मेश्राम यांनी केले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक. राजेंद्र जाणे (कृषि तज्ञ) यांनी चंद्रपूर येथील शेतकऱ्यांना कपाशी पिकावर येणाऱ्या विविध कीड जसे तुडतुडा , गुलाबी बोंड अळी पात्या गळ होणे , या विवध रोगबद्दल व त्यावरील उपाय योजना बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल.
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध गावातून अनेक शेतकऱ्यांनी कॉन्फरन्स मध्ये प्रश्न विचारून त्यांच्या शंकाचे निराकरण केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

बल्लारपूर येथे मोपेड रैलीद्वारे हर घर झेंडा अभियान बाबत जनजागृती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने बल्लारपूर पोलिस स्टेशन …

हर घर तिरंगा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचा होणार सत्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 13 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved