
प्रतिनिधी-कैलास राखडे
नागभीड: नवेगाव पांडव येथील एका व्यक्तीच्या अंत्यविधीत सामील झालेल्या ७ व्यक्तींवर मधमाश्यांनी हल्ला केला. या घटनेची परीसरात चांगलीच चर्चा आहे. गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात या जखमींवर उपचार करण्यात आले, उल्लेखनीय बाब ही की, नवेगाव येथे अंत्यविधीवर हल्ला होण्याची या महिन्यातील दुसरी घटना आहे,
यापूर्वीच्या हल्ल्यात ३५ व्यक्ती जखमी झाले होते, नवेगाव पांडव येथील एका व्यक्तीचे बुधवारी निधन झाले, यव्यक्तीची अंत्ययात्रा गुरुवारी काढण्यात आली. या व्यक्तीच्या अंत्यविधीत गावातील नागरिक तसेच परीसरातील नातेवाईक सामील झाले होते.
विधीनुसार विश्रामस्थळावर म्रुतदेह ठेवण्यात आल्यानंतर बाजुलाच असलेल्या मोहोळातील मधमाशांनी अचानक या व्यक्तीवर हल्ला केला, अचानक झालेल्या या हल्ल्याने अंत्यविधीत सामील झालेले लोक बचावासाठी वाट मिळेल तीकडे पळु लागले, तरीपण मधमाश्यांनी पाठलाग करुन ७ व्यकीना चावा घेतला,
नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून प्राप्त माहितीनुसार अनिकेत मशाखेत्री (२१) , लीला देशमुख (६५) , मानीक मशाखेत्री (५५) , विलास नरूले , (४०) , उद्धव खेकारे (५९) , जीतेंद्र रडके(३५) , आणि अरविंद मशाखेत्री ( ४४) यांचा जखमीत समावेश असून प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना सुट्टी देण्यात आली.