
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- राज्य परिवहन महामंडळ शासनात विलीनिकरण करण्यात यावे याकरिता दिनांक ३०/१०/२०२१ च्या मध्यरात्री पासून चिमूर आगारातील सर्व कर्मचारी सहपरिवार शांततेच्या मार्गाने बेमुदत उपोषणाला बसले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहनच्या सर्व संघटना कृति समितिने संपूर्ण महाराष्ट्रात राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनिकरण करने व अन्य मागण्यासाठी उपोषण सुरु केले आहे,
कर्मचाऱ्यांचे शासकीय विलीनिकरण करण्यास कोणताही ठोस निर्णय आज पर्यंत झाला नाही त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा भावना दुखावल्या गेल्या आहेत, आज चिमूर आगारातील सर्व कर्मचारी संपावर असल्यामुळे चिमूर आगारातील एकही बस बाहेर निघाली नसल्यामुळे प्रवासी वाहतुकीत मोठा परिणाम झाला आहे.