Breaking News

खरीप पणन हंगाम 2021-22 अंतर्गत धान खरेदीला सुरुवात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि.8 नोव्हेंबर: खरीप पणन हंगाम 2021-22 मध्ये शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 33 धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी दिली आहे. शासन निर्णयानुसार धान खरेदीचा कालावधी दि. 1 ऑक्टोबर 2021 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत असणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ऑनलाइन नोंदणीकृत शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या धानाची विक्री करावी.

शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आपले आधार कार्ड, वोटिंग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक आदी संपूर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या धानाची नियोजित वेळेत विक्री करावी. असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved